
उत्तराखंड:- पिथौरागढ मधील जवाहर नवोदय विद्यालयात चौकीदाराने एका दहाव्या वर्गातील मुलीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे.मुलीच्या गुडघ्याचे हाड फॅक्चर आणि पायाच्या अनेक भागात जखमा झाल्या आहेत.तसेच चौकीदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या पालकाने केली आहे.
मारहाण झालेल्या विद्यार्थिनीला पिथौरागढ येथून हल्द्वानी येथील सुशीला तिवारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तेथून तिला एम्स ऋषिकेशमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.पीडित दहावीच्या विद्यार्थ्याच्या पालक कुटुंबीयांनी शनिवारी डीएमची भेट घेत कारवाईची मागणी केली.
मुलीच्या पालकांनी शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,शाळेतील चौकीदार महेश कुमारने इयत्ता दहावीत शिकत असलेल्या माझ्या मुलीला विनाकारण लोखंडी रॉडने मारहाण केली.त्यामुळे मुलीच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यावर आणि पायाच्या अनेक भागात जखमा आहेत.तसेच मुलीचा विनयभंग केल्याचा म्हंटले आहे.या मारहानीत इतर मुली आणि एक मुलगाही जखमी झाला असल्याचे दिलेला तक्रारीत नमूद केले आहे.
मात्र दुसरीकडे शाळा व्यवस्थापनाने हा दावा खोटा असल्याचा म्हंटले आहे.वर्गात दोन भटकी कुत्री घुसल्याने चौकीदाराने कुत्र्यांना मारताना मुले-मुली आडवे आल्याने चुकून विद्यार्थिनीला मार लागला.विनयभंगाचे आरोप चुकीचे आहेत. शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणी चौकीदाराला क्लीन चिट दिली असतानाच,अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे कारण देत त्याच्या बदलीची शिफारसही केली आहे.