
*वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला बामनकर कुटुंबीयांना काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत*
राजाराम : कमलापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारा मौजा – खांदला येथे दिनांक २४/०९/२०२५ रोजी नामे शिवराम गोसाई बामनकर रा.खांदला वय ७६ वर्ष हे आपला गाई चराईसाठी जंगलात गेले असता अचानक वाघाने हल्ला केला त्या हल्ल्यात नामे शिवराम बामनकर हे गंभीर जखमी झाले.त्यानंतर जखमी झालेला शिवराम बामनकर यांना सुरेश पेंदाम यांनी दुचाकीवर घरी घेऊन आले व सरकारी दवाखाना राजाराम नेले त्यानंतर अहेरी,चंद्रपुर आणि नागपुर येथे त्यांचा उपचारासाठी नेले होते.
परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान नामे शिवराम गोसाई बामनकर यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे वाघाच्या हल्यात मृत्यु झाल्याने बामनकर कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर उभा झालेला आहे.तसेच वाघाच्या हल्यात मृत्यु झालेला शिवराम बामनकर यांच्या पश्चात, त्यांची पत्नी आणि त्याची सुन हे दोघीच महीला सदस्य आता सध्या घरी आहेत.त्यांना आता घरी कामवुन देणारा पुरूष व्यक्ती आता घरामध्ये कोणीच नाही आहे.
म्हणुन बामनकर कुटुंबीयांचा या गंभीर समस्यांचा विचार करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यामन मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरीचे माजी पं.सं.सभापती श्री. भास्कर तलांडे, राजारामचे उपसरपंच श्री. रोशन कंबगोणीवार, माजी सरपंच श्री. नागेश कन्नाके, ग्राम पंचायत सदस्य, श्री. रमेश पोरतेट, सूर्यकांत आत्राम, सुरेश पेंदाम,नामदेव पेंदाम, नारायण चालूरकर, इसपात गावडे, उमेश पोरतेट आदी उपस्थित होते.