लाखांदूर तालुक्यातील घटना;पोलिसांत गुन्हा दाखल.
लाखांदूर/भंडारा:- पूर्वी अतिरिक्त पदभार असलेल्या ग्राम पंचायती मधील काही प्रलंबित काम आटोपून कार्यालयीन कामकाजाकरीत सद्या पदभार असलेल्या ग्रामपंचायती मध्ये जात असलेल्या ग्रामसेवकाला रस्त्यात अडवून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणारा प्रकार धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात घडल्याची ही घटना २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ते विरली बू मार्गावर घडली. या घटनेत ग्रामसेवक संजय गहाने यांच्या फिर्यादीवरून आरोपी लोकेश एकनाथ भेंडारकर रा.विरली बू याचे विरोधात लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रानुसार, घटनेतील आरोपी लोकेश एकनाथ भेंडारकर हा विरली बू ग्राम पंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य असून आणि फिर्यादी ग्रामसेवक संजय गहाने हे एकाच ग्राम पंचायत मध्ये पदावर कार्यरत आहेत. ग्रामसेवक गहाने हे सद्या विरली/बू ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे या आधी विरली.बू ग्राम पंचायतीसह नजीकच्या विरली खुर्द ग्राम पंचायतीचा अतिरिक्त पदभार होता. काही दिवसांपूर्वी त्यांचेकडून विरली खुर्द येथील पदभार काढून त्यांना आथली येथील पदभार देण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी ग्रामसेवक गहाने हे आधी पदभार असलेल्या विरली खुर्द ग्राम पंचायतीमधील काही प्रलंबित काम आटोपून विरली बू. कडे येण्यास निघाले. परत येत असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास विरली खुर्द ते विरली बू मार्गावर विरली खुर्द गावाच्या बाहेर आरोपी ग्रामपंचायत सदस्य भेंडारकर याने गहाने यांना रस्त्यात अडविले.त्यामुळे, ग्रामसेवकांनी आरोपीस तु मला कशाला अडवलास अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने ग्रामसेवकास अश्लील शिवीगाळ करीत तु जर मी सांगितलेले काम केले नाही तर तुला जीवने मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे दाखल रिपोर्ट मध्ये नमूद आहे.
त्यावरून, घटनेतील फिर्यादी ग्रामसेवक संजय गहाने यांचे फिर्यादीवरून आरोपी ग्राम पंचायत सदस्य लोकेश भेंडारकर याचेविरोधर लाखांदूर पोलिस स्टेशन येथे अपराध क्र.१३/२०२५ कलम २९६ १२६(२), २२४, ३५१(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरच्या पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहेत.