
नागपूर:- राज्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि खानदेशात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या दोन दिवसात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२६ नंतर राज्यात जोर वाढण्याची शक्यता
सध्या पावसाचा जोर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागात असून २३ आणि २६ जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, इतर भागातील पाऊस कमी झाला आहे. राज्यात पुन्हा २६ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.