संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे वसंत पंचमी उत्साहात साजरी
एटापल्ली : संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे वसंत पंचमी निमित्त विद्यााची देवी सरस्वती माता यांचे पूजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तोत्र पठण व भक्तीगीत गायन करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय संस्कार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्या, संस्कार आणि शिस्त यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका सौ. पूजा दासरवार यांनीही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विध्यारंभ संस्कार पार पाडण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांनी पाटीवर अक्षरलेखन करून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. पालकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.
वसंत पंचमीच्या या पवित्र दिवशी झालेल्या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
