
राष्ट्रीय मानवाधिकार संगठना अहेरी तालुका कार्यकारिणी गठीत.
गडचिरोली:- अहेरी तालुका येथील तालुका राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तालुका कार्यकारिणी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन असो दिल्ली यांची तालुका कार्यकारिणी विदर्भ अध्यक्ष जावेद अली व गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली 13 जुलै रोजी अहेरी येथील जिल्हापरिषद च्या विश्रामगृहात पार पडली.
यावेळी जिल्हा सचिव माजी प्राचार्य रतन दुर्गे,जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे,तालुका अध्यक्ष नागेश मडावी तालुका उपाध्यक्ष माँतय्या आत्राम तालुका सचिव कैलास कोरेत,तालुका सह सचिव सुरेश दुर्गे.तालुका कोषाध्यक्ष रोशन सय्यद, तालुका प्रसिद्धी प्रमुख तिरुपती मडावी,कार्यालय प्रमुख अमोल अलोणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विदर्भ अध्यक्ष यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन बद्दल माहिती देतांना म्हणाले तालुक्यात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने गप्प राहू नये व मानवावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उचलून न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने कटिबद्ध राहावे व जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की. गोर गरीब जनतेच्या पाठीशी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नेहमी उभा आहे वा राहणार. अन्याया विरोधात नेहमी आपण उभे रहा आपल्या सोबत राष्ट्रीय मानवाधिका संगठनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे नेहमी आपल्या सोबत आहेत. कितीही मोठा संकट येऊ दया आपले प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास सुद्धा नेहमी आपल्या सोबत राहणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. या वेळी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, तालुका उपाध्यक्ष मानतय्या आत्राम, तालुका सचिव कैलास कोरेत, तालुका सहसचिव सुरेश दुर्गे, तालुका कोषाध्यक्ष रोशन सय्यद, तालुका प्रसिद्धीप्रमुख तिरुपती मळावी, कार्यालय प्रमुख अमोल अलोणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,