
तिर्थक्षेत्र हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
हनुमान मंदिराचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांच्या हस्ते फोडण्यात आली दहिहंडी
चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. चपराळा, गडचिरोली जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे, जिथे श्री हनुमान मंदिर (प्रशांत धाम) आहे. येथे दरवर्षी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जन्माष्टमीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते, आणि उत्सव मोठ्या भक्तीभावाने दरवर्षी साजरा केला जातो.
याही वर्षी श्री. हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा (तीर्थक्षेत्र दर्जा क) पो. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली राजी न. १८७/१६५ येथे दिनांक.१५/८/२०२५ ला रात्रो १२ वाजता असंख्य माता भगिनींच्या उपस्तिथीत श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भजनाच्या मृदंग आवाजात रिती रीजावाप्रमाणे पाळणा गावून साजरा करण्यात आला.
आणी शनिवार ला सुमारे १२ वाजता गोपाल काल्याचा आयोजन करण्यात आले होते तरी श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी चा कार्यक्रम संजय पंदिलवार अध्यक्ष श्रीं हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा यांच्या हस्ते गोपालकाल्याची दहिहंडी फोडण्यात आली. व भक्तजणांना प्रसाद वाटण्यात आला. संचालक मंडळ रामचंद्र पा. बामनकर, मनोहर पा. बामनकर, सुधाकरजी बात्कुलवार, मांडूरवार, अंजेश सर्व संचालक मंडळ तथा दयानंद कोक्केवार उपसरपंच चपराळा आणी अनेक भक्तगण उपस्थित होते. पोलीस स्टेशन आष्टी चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आणी सुमारे १ जावता सर्व भक्तजनांना महाप्रसाद वाटण्यात आला. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आष्टी परिसरातील बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.