
एटापल्ली येथे तालुका स्तरीय महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद- महिला सक्षमीकरणाचा दृढ सकंल्प
एकात्मीक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प एटापल्ली यांच्या वतीने आयोजीत तालुकास्तरीय महिला मेळावा दिनांक 08 ऑक्टोंबर 2025 एटापल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादर लाभला.
कार्यक्रमाचे उदघाटन मा. तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम, सिनेट सदस्य, गोंडवाना विदयापीठ, गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले. तसेच कार्यक्रमास मा. श्री. हेमंत गांगुर्डे, तहसीलदार एटापल्ली, डॉ. आदिनाथ आंधळे, गटविकास अधिकारी, प. स.एटापल्ली, श्री. मच्छिद्र नागरगोजे, पो.नि. एटापल्ली, डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली, श्री. बरडे तालुका व्यवस्थापक, उमेद, सारीकाताई गडपल्लीवार, सजंय चरडुके, माजी. जि.प. सदस्य, जनार्धन मल्लावार, माजी उपसभापती, प.स. एटापल्ली, संभा हिचामी यांची उपस्थीती लाभली.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रिती बुरीवार, (स्री रोग तज्ञ.), डॉ. अपूर्वा आकरे, (लीड पाथ), तसेच प्रतीक्षा वनवे, पोलीस उपनिरीक्षक यांनी महिलांना आरोग्य, पोषण व महिला विषयक कायदे याबाबत उपस्थीत महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात लेक लाडकी योजनेअतंर्गत लाभ प्राप्त लाभार्थी व मातांचा प्रशस्तीपत्र देउन मुलींच्या शिक्षण, संगोपन व सन्मासाठी दाखविलेल्या प्रगतीशील भूमिकेबददल गौरविण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला. विविध विभागातील (पंचायत, महसूल, शिक्षण, आरोग्य, कृषी) उत्कृष्ट कार्य करणा-या महिला अधिकारी व कर्मचारी, महिला सरपंच, तसेच गुणवंत विदयार्थीनींचा सन्मान करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.
मेळाव्याच्या सांस्कृतीक कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विविध विभागातील महिला कर्मचा-यांनी ” बेटी बचाव बेटी पढाव, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, कृषी व सामजीक विकास या विषयांवरील प्रभावी सादरीकरण केले.
तसेच या मेळाव्यास भव्य पोषणयुक्त आहार प्रदर्शनी ही भरविण्यात आली,
प्रास्ताविकात, श्री. विदयाधर बुरीवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एटापल्ली यांनी सांगीतले की, ” या मेळाव्याचा उद्देश केवळ एकत्र येणे नसून महिला सामर्थ्याची जाणीव करून देणे हा आहे, श्री ही घराचा आधाराच नाही तर समाजाला दिशा देणारी शक्ती आहे.” त्यांनी पुढे सांगीतले की, महिला व बाल विकास विभाग महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचविण्यास कटिबदध आहे.
प्रमुख अतिथी तनुश्रीताई आत्राम यांनी महिलांनी विविध योजनांचा लाभ घेउन आत्मनिर्भर व्हावे, तसेच बेटी बचाव बेटी पढाव अभियानाव्दारे आरोग्य, शिक्षण, आणि समान हक्काचे सरंक्षण
यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन केले.
तहसीलदार, गट विकास अधिकारी, आणि तालुका आरोग्य अधिकारी, यांनीही आपल्या भाषणातून महिलांना मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती श्वेता उपाध्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. किर्ती खराटे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, श्री. विदयाधर बुरींवार, तसेच पर्यवेक्षिका कु. किर्ती खराटे, कु. कोमल तुंगीडबार, माधुरी शेडमाके, सरिता लेकामी, सरंक्षण अधिकारी मनेश्वर करेंगामी, दिपक नागापुरे, नामदेव पडको यांचे सहकार्य लाभले.