*तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत युवास्पंदन विद्यालयाचे सुयश*
*कोरची:- जितेंद्र सहारे* जितेंद्र सहारे
धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी या शाळेत दि. 2 ते 3 जानेवारी दरम्यान तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत युवास्पंदन विद्यालय भिमपूर या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या प्रदर्शनीत माध्यमिक खुल्या गटातून अनमोल विजय उंदिरवाडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक तर उच्च माध्यमिक खुल्या गटातून कु. नेहा सुकरु दरवडे हीने सादर केलेल्या प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक मिळाला आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक निलकमल बिंझलेकर आणि प्रयोगशाळा सहाय्यक नितेश कराडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे क्षेय शाळेचे संस्थापक शालीकराम कराडे, मुख्याध्यापक सुषमा टेंभुरकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.