*विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा*
*-गटशिक्षणाधिकारी अमित दास यांचे प्रतिपादन.विज्ञान प्रदर्शनाचा समारोप*
*कोरची :- जितेंद्र सहारे*
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून संशोधनावर भर द्यावा देशाचा विकास घडवून आणावा ,असे प्रतिपादन कोरची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी केले.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने कोरची मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून गटशिक्षणअधिकारी अमित दास, अध्यक्ष म्हणून धनंजय स्मृती विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग नागपुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुरज हेमके, सुरेश काटेंगे, रामकुमार नाईक , नरेश रामटेके, रेशमा कंगाली, कु. देशमुख, कु. उके, कापगते, भजने ,वाघमारे आधी उपस्थित होते.
सदर दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली.दुसऱ्या दिवशी प्रतिकृती सर्वांसाठी खुली ठेवण्यात आले होते. व प्रतिकृतीचे परीक्षण करून मूल्यमापन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक खुला गटातून प्रथम क्रमांक दिलशान अजिज शेख (पारबताबाई विद्यालय कोरची) द्वितीय क्रमांक नेहा सुखरू दरवडे (युवास्पंदन विद्यालय भिंमपुर)तृतीय क्रमांक सृष्टी देविदास कराडे(जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्केकसा)व प्राथमिक आदिवासी गटातून प्रथम क्रमांक सानिया चितेला दर्रो (केंब्रिज केरला मॉडल स्कूल कोरची)यांनी पटकाविला.
माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक क्रिश संतोष मेश्राम(अरुणा विद्यालय कोटरा), द्वितीय क्रमांक अनमोल विजय उंदीरवाडे (युवास्पंदन विद्यालय भिंमपुर),तृतीय क्रमांक योगेश गौतम सोनकुकरा(पारबताबाई विद्यालय कोरची) व व माध्यमिक आदिवासी गटातून प्रथम क्रमांक वीसाताई अशोक मडावी(भगवंतराव हायस्कूल बोटेकसा)यांनी पटकावला.
शिक्षक गटातून प्राथमिक शिक्षकातून प्रथम क्रमांक नरेश सिद्धार्थ रामटेके (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदळी.)तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सुरज दिलीप हेमके (पारबताबाई विद्यालय कोरची) प्रयोगशाळा परिचर या गटामध्ये प्रथम क्रमांक यशपाल शेखावत (धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी.)यांनी पटकाविला.
विज्ञान प्रदर्शनात एकूण 63 प्रतिकृती आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज हेमके, संचालन होमराज बिसेन तर आभार लागते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व कर्मचारी व तालुक्यातील विज्ञान शिक्षक यांनी सहकार्य केले.