आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्पीड ब्रेकर बसवा
आष्टी शहरवासीयांनी केली निवेदनातून मागणी

भास्कर फरकडे प्रतिनिधी
फोटो
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. येथे शाळा, दुकाने तसेच रहिवासी भाग असल्याने पादचाऱ्यांची वाहतूकही सतत सुरू असते.
अलीकडच्या काळात या परिसरात काही किरकोळ अपघातही घडले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक झाले आहे.
वरील परिस्थितीचा विचार करून आपण संबंधित वाहतूक विभागाशी समन्वय साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तातडीने स्पीड ब्रेकरची सोय करून द्यावे, अशी मागणी आष्टी शहरातील ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक आष्टी, सरपंच ग्रामपंचायत आष्टी यांना लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना आनंद कांबळे, आशिष क्षिरसागर, रत्नाकर गोटमुकुलवार, सिद्धार्थ जिल्हेकर, आकाश हिंगाणे, तुषार येलमुले व आष्टी शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
