
सकीनगट्टा प्रमाणे तालुक्यातील इतरही अंगणवाड्यांचे चौकशी करावी:- सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्याशी संबंधित केसेस सुरु असूनही नोंदी नियमितपणे भरल्या जात नाहीत. लसीकरण, आहार वितरण व मातामुलांच्या आरोग्य तपासणीसंबंधी अहवाल अपूर्ण आहेत. सकीनगट्टा येथील अंगणवाडीत आहाराच्या साहित्यात अळ्या व मुदत बाह्य वस्तु आढळले होते.काही ठिकाणी तर आहारात दर्जाहीन अन्न साहित्य दिल्याच्या तक्रारीही स्थानिकांकडून समोर आल्या आहेत. अंगणवाड्यांना अधिकारी भेटी देत नाही. तालुक्यातील अनेक अंगणवाडीतील पटांगणात केरकचऱ्याचे साम्राज्य असल्याने मुलांना खेळण्यायुक्त जागा नाही. गरोदर मातांना योग्य आहार दिले जात नाही. तालुक्यातील अनेक अंगणवाडीत सदर प्रकार सुरू असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील महिलां आणि बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्याने तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घ्यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे यांनी केली आहे.