२५ वर्षापासून मुस्लिम समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम; सामुहिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध !
भंडारा, गोंदिया, नागपुर, जिल्ह्यातील जोडप्यांचा समावेश
भंडाराः :- आजची लग्न पध्दती मोठी खर्चिक झाली आहे. सामान्य कुटूंबातील नागरिकांना मुला-मुलींना शिक्षण शिकविणे, पालनपोषण करणे कठीण झाले आहे. तसेच मुला-मुलींचे लग्न करणे अवघड होत आहे. आजच्या खर्चिक लग्न परंपरेतुन सामान्य नागरिकांना दिलासा देवुन लग्नबंधन हे सुलभ होण्यासाठी सोशल वेल्फेअर एण्ड रिसर्च एज्युकेशनल सोसायटी भंडारा, द्वारा संचालित खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सामाजिक दायीत्व स्विकारून गरजु बांधवांच्या मुला मुलींचे विवाह लावून देत आहे. हे विशेष.
यावर्षी खिदमत संस्थेच्या माध्यमातून १५ नव दाम्पत्य विवाह बंधनात अडकले आहेत. खिदमत संस्थेची सदैव प्रगती होण्यासाठी अनेक नागरिकांचे आशीर्वाद त्यांच्या कार्याला बळ देत आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष असरार शेख यांनी केले. ते खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक येथील हाजी सलाम क्रीडा संकुलनात आयोजित मुस्लिम वर वधुच्या सामुहिक विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
भविष्यात अशाप्रकारे सामाजिक जिम्मेदारीचे कार्य अविरत चालू राहील असे मत आयोजकांनी व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध धार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला खिदमत सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने आरमारी, सोफा, कुलर, दिवान, फ्रिज, सुटकेश तसेच जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या आहेत. विवाह सोहळ्याला आलेल्या वधू वर यांच्याकडील पाहुण्यांना संस्थेच्या वतीने सकाळ व सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात जवळपास १० हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने आतापर्यंत सामुहिक विवाह सोहोळ्यात २०० ते २२५ जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. त्यात भंडारा, गोंदिया, नागपुर, जिल्ह्यातील जोडप्यांचा समावेश आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल कनोजे व प्रास्ताविक खिदमत सोशल वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असरार शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजु सलाम पटेल यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता खिदमत सोशल वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असरार शेख, उपाध्यक्ष ईकबाल खान, सचिव कलाम बेग, सह-सचिव अशफाक सलाम पटेल (राजु), कोषाध्यक्ष शोबीर अली, सह. कोषाध्यक्ष जहीर अंसारी, सदस्य नईम शेख, सैय्यद रिज़वान हसन, इकबाल कनोजे, इरफान खॉ पठान, ताहीर बेग, समीर नवाज़, इमरान हुसैन, कलाम पठाण, अफशान बेग, इरफान खान, जाफर शेख, रफीक भाई तिरोडा, अकील खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भंडारा येथील खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने मागील २४ ते २५ वर्षा पासुन सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम राखण्यात आली असून समाजातील गोरगरीब मुला मुलिंचे वाढत्या खर्चाला बगल देत वेळेची व पैशाची बचत होऊन या निमित्ताने सामाजिक एकोपा जोपासल्या जावा हा उद्देश ठेऊन मागील २४ ते २५ वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यात येत आहे.
२५ वर्षापासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम
समाजातील लोकांची आर्थिक स्थितीमुळे आभाळ होऊ नये तसेच अनावश्यक खर्च टाळल्या जावा व वेळेची व पैशाची बचत व्हावी हा हेतू ठेऊन सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची निव टाकण्यात आली असल्याची माहिती या सोहळ्याचे प्रमुख तथा मार्गदर्शक असरार शेख यांनी दिली. यावेळी मुस्लिम समाजातील अनेक गणमान्य प्रामुख्याने उपस्थित होते. विवाह सोहळा मुस्लिम समाजाच्या रितीरीवाजानुसार पार पाडण्यात आला.
