
*पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे एकनिष्ठतेने पालन करा.*
*भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना आवाहन*
*भाजप एटापल्ली तालुका कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत उपस्थिती व मार्गदर्शन*
*दिनांक : 08/08/2025*
*गडचिरोली : भारतीय जनता पार्टी एटापल्ली तालुका कार्यकारिणीची विस्तारित बैठक बाबुरावजी गंपावार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यां नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.*
*यावेळी मार्गदर्शन करताना डॉ देवराव होळी यांनी आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडावी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेला विश्वासात घेवुन कार्य करावे असे आवाहन केले*
*माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते नियुक्ती घोषित करण्यात आली. यावेळी उपस्थित नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.*
*यावेळी प्रशांत आत्राम आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री व व्येकटेश मडावी, मोहन नामेवार जिल्हा सचिव, प्रसाद पुलरवार तालुका अध्यक्ष, बाबुराव जी गंपावार भाजप जेष्ठ नेते, विनोद आकमपल्लीवर जिल्हा उपाध्यक्ष, अशोक पुलरवार, राकेश तेलकुंटलवार शहराध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका महामंत्री राकेश हिरा व बाबला मुजुमदार, अशोक चकिनारपवार, बालाजी मोहुर्ले, प्रशांत मंडल, वनिता कोरामी, विजयालक्ष्मी जंबोजवार, जया पुडो, भाग्यश्री खोब्रागडे, रीना बेपारी, सुरेखा अडगोपुलवार, नितीन तोडेवार, राकेश विरमलवार, संजय तिम्मा तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.*