*सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकारणी दोषींवर कठोर कार्यवाही करण्यासाठी सरपंच संघटनेचा मुख्यमंत्री ना निवेदन*
🖋ताहिर शेख🔸केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरनी दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि सरपंच आणि स्थानिक संस्थाच्या लोकप्रतिनिधीना कलम 353 अंतर्गत संरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. धिरज पाटील सर गटविकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अशोक उसेंडी सरपंच पुराडा, सचिव मंगेश कराडे उपसरपंच गुरनोली, कार्याध्यक्ष रोशन सय्यद ग्रा. पं. सदस्य गेवर्धा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप वरखडे सरपंच धनेगाव, विजय तुलावी सरपंच अरततोंडी, सुषमा मडावी सरपंच गेवर्धा, सुप्रिया तुलावी सरपंच गुरणोली, यमुलता पेंदाम सरपंच खेडेगाव, शोभा गावराणे सरपंच चिरचाडी, सविता कुमरे सरपंच चिखली, मोहणभाऊ पुराम उपसरपंच भटेगाव, किरण आकरे उपसरपंच कढोली, वासुदेव बहेटवार उपसरपंच चिखली,गुरुदेव निकोडे उपसरपंच सोनेरांगी, जुमनाके सरपंच चिनेगाव, हरिराम चूरगाये सरपंच चांदागड, सुभाष डोमडे उपसरपंच चांदागड, रामसाय मडावी सदस्य चिखली उपस्थित होते.