संत तुकाराम महाराजचे शिष्य श्री. संताजी जगनाडे महाराज हे गावोगावी फिरून सर्व समाजाला जागृत करण्याचे काम केले….. प्रमोद पिपरे
श्री. संताजी बचत गट (आशीर्वाद नगर) गोकुळनगर गडचिरोली, यांच्या द्वारा आयोजित श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम दि. 9.1.2025 रोज गुरुवार ला ऍड मंगेश भरडकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आले.
यावेळी श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.संताजी आपल्या वाणीने,लेखणीने,कर्तुत्वाने वैदिक धर्माचे,गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.यातील एक महान संत म्हणजे श्री.संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते.संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेम्बर १६२४ रोजी तेली समाजात जन्म झाला त्यांचे मुळ गाव महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील चाकण या गावी झाले.
आज संडुबरे या ठिकाणी श्री.संत जगणाडे महाराजाची समाधी व भव्य स्मारक आहे.
संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कान्ठ्कानी इंदायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते तेरा दिवसात पुन्हा लिहून काढली.अशा प्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचारांचे महान कार्य श्री.संत संताजी जगनाडे महाराजांनी केली.
एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटनाणी केले पाहिजे असे आव्हाहन श्री.प्रमोदजी पिपरे यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने
सौ. योगिताताई पिपरे, माजी. नगरध्यक्ष न. प. गडचिरोली तथा उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महाराष्ट्र प्रा. ते. महासभा,श्री. सुधाकरजी लाकडे, पुष्पाताई करकाडे सामाजिक कार्यकर्त्यां,खणके मॅडम,सुमन गव्हारे, नीलिमा भरडकर, वंदना राखडे, वंदना कुणघाडकर, वंदना लाकडे निर्मला हजारे मंगला कांबळे व तेली समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.