
*महसूलसेवकांचा संप सुरूच;* *सेवा पंधरवड्यावर परिणाम*
*महसूल प्रशासनाची दमछाक;*
*चतुर्थ श्रेणीच्या दर्जासाठी महसुल सेवकांचे उपोषण*
जनार्धन नल्लावार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली (ता.प्र). गडचिरोली जिल्ह्यात 12 तालुक्यापैकी एक असलेल्या दुर्गम अश्या एटापल्ली तालुक्यात जनता व महसूल प्रशासनामधील महत्त्वाचा घटक असलेले महसूल सेवक संपावर असल्याने तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार (दि. १७) सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान *”सेवा पंधरवडा”* म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यान तालुक्यात विविध प्रकारचे सर्वांसाठी घरे अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत तयार करणे, सक्षम पंचायत, जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण करणे, उपजिविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे, गाव होईल समृध्द, राज्य होईल प्रगत आदी शासकीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. उपक्रमाची माहिती जनतेपर्यंत तळागाळात पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका महसूल
सेवक( कोतवाल) बजावत असतो. मात्र चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा यासाठी ते गेल्या 16 दिवसापासुन संविधान चौक, नागपूर. येथे साखळी उपोषण करीत असल्याने सेवा पंधरवडा हा शासकीय उपक्रम राबविताना प्रशासनाला मोठी दमछाक करावी लागत आहे. मात्र शासनाने अद्यापही त्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही.
*चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा म्हणून महसुल सेवक गेल्या 16 दिवसापासून संपावर आहेत.* *आज नागपूर येथे साखळी उपोषण सुरू आहे. राज्यभर सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून*
*त्या सेवा पंधरवडा उपक्रमात आम्ही सहभागी नाही, याची जाणीव, खंत आहे.* *शासनानेही आमची चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करून “सेवा पंधरवड्यात”*
*सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.*
श्री- विलास तुळशीराम चांदेकर तालुका अध्यक्ष महसूल सेवक संघटना तालुका शाखा एटापल्ली जिल्हा गडचिरोली
सद्या महत्वाचे म्हणजे सतत होणार्या पावसामुळे पिक पंचनामे करणे,
सदर आंदोलन काळात गडचिरोली जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील सर्व महसूल सेवक हे सहभागी झाले. असून त्यामुळे गावस्तरावरील digital crop ई-पिक पाहणी करताना अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी लागणारी कागदपञे जसे की, उत्पन्नाचा दाखला, non creamy layer दाखला व यावर्षी अतिवृष्ठी झाल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांना गावपातळीवर शेत सर्वेक्षणाचे काम करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.
शेतकर्यांची शासकिय अनुदानासाठी कागदपञे गोळा करणे.
ग्राम महसुल अधिकार्यांना अनुदानाच्या याद्या बनविन्यासाठी मदत करणे, शेतकर्यांना उपयोगी सातबारा, आठ-अ, फेरफार वितरित करताना महसुल सेवकांची मोलाची मदत होते.
महसुल सेवक संपावर असल्यामुळे गावातील सामान्य माणसाला सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात आता सेवा पंधरवडा राबविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने महसूल सेवकाच्या संपावरील तोडगा काढून त्यांना सेवा पंधरवाडा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव, सामान्य जनतेकडून केली जात आहे.