
*प्रशांत आत्राम यांची भारतीय जनता पार्टीच्या अनु. जमाती मोर्चाच्या जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती!*
*श्रीमंत राजे आत्राम यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख*
एटापल्ली;-मा. प्रशांत आत्राम – माजी सरपंच, माजी तालुकाध्यक्ष भाजपा एटापल्ली व विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, यांची भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्ह्यातील “जिल्हा महामंत्री (अनु. जमाती मोर्चा)” पदावर निवड करण्यात आली आहे.
मा. प्रशांत आत्राम हे माजी राज्यमंत्री वने व आदिवासी विकास तसेच माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा मा. श्रीमंत राजे आत्राम यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने कार्य केले आहे.
भाजपाने अनुसूचित जमाती मोर्चाला अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती केल्याचे मानले जात असून, या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पक्षाचे बळ अधिक वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रशांत आत्राम यांचे विविध सामाजिक कार्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता त्यांची ही निवड झाल्याचे सांगितले जात आहे.