छत्तीसगड :- दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून भीषण चकमक सुरू असल्याची माहिती आहे. या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांचे मृतदेह घटनास्थळावर सापडले आहेत. यासोबतच चकमक स्थळावरून SLR, 303, 315 बोअर आणि 12 बोअर सारखी शस्त्रेही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहेत. बिजापूर जिल्ह्याचे एसपी म्हणाले की, चकमकीत सहभागी असलेले सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
आज दिवसभर सुरु होती चकमक.
पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या जमावाच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ही संयुक्त कारवाई सुरू केली होती. सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि ही चकमक दिवसभर सुरू होती. ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची अधिक माहिती जाहीर करण्यात येणार असल्याची बिजापूर जिल्ह्याचे एसपी याने म्हटले आहे .
चकमकीत 9 नक्षलवाद्यांचे सापडले मृतदेह.
मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापासून नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांमध्ये हे मोठे यश मानले जात आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की ते परिसरात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नक्षलवादाच्या विरोधात अशा कारवाया सुरू ठेवतील. येथे छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत नक्षलवादी सातत्याने आत्मसमर्पण करताना दिसत आहेत.
एका दिवसापूर्वी पाच नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण.
सोमवारी विजापूरमध्ये पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी दोघांवर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोडियम बुद्री, मल्लम देवा आणि करातम हडमा या महिला अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केले.