 
                अहेरी पोलिस स्टेशन येथे राष्ट्रीय एकता दिवस
अहेरी(गडचिरोली):– दि. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंती निमित्त गडचिरोली जिल्हा पोलीस दल अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी व पोलीस स्टेशन अहेरीच्या वतीने एसडीपीओ अजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन अहेरी येथे सकाळी 6.00 वा. Run for unity marathon स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेकरिता पोलीस स्टेशन अहेरी हद्दीतील 200 ते 250 युवक युवती व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी, पोलीस स्टेशन अहेरी,c-60 प्रानहिता, स्वान पथक, MT, BDDS, मुख्यालय प्रानहिता चे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. प्रथम, द्वितीय, तृतीय मुलं व मुलींना रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

 
                         
                     
                     
                     
                     
                     
                     
                    