
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील मौजा पेरमिली येथे पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील ५० गावांचा ग्रामसभा कडून जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमिली, आणि पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील शेंडीया, पाटील, गायता, भूमिया, पेरमा हे उपस्थित होते.कार्यक्रमाला उदघाटकाच्या शुभ हस्ते आदिवासी समाजाचे देवी देवतांचे आणि महापुरुषांचे पुजा करून सप्तरंगी झेंडा वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
तसेच सुरुवातील पेरमिली (कोडसेलगुडम) येथे पहिला झेंडा वंदन करून आदिवासी समाजाचा पारंपरिक ढोल वाजवत नृत्य सदर करत भव्य रॅली काढण्यात आले. पेरमिली गोटूल भूमि येथे दुसरा झेंडा वंदन करून, पारंपरिक पेरमिली ईलाका गढी मध्ये गढी पुजा करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील गढी दसऱ्या जागा मध्ये भव्य कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये कार्यक्रमात आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य व गोंडी गीतांवर नृत्य सादर करण्यात आले.
यावेळी पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील ५० गावातून शेकडो आदिवासी बांधव कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आदिवासी समाजाला टिकवुन ठेवण्यासाठी प्रथम आपला रीती, रिवाज, बोली भाषा, संस्कृति, प्रथा, परंपरा जिवंत ठेवला पाहिजे. आदिवासी समाज संघटित आणि जागृत असला पाहिजे तसेच आपला मुलांना उच्च शिक्षित करून, चांगले अधिकारी/कर्मचारी बनले पाहिजे. असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आला.तसेच सदर कार्यक्रमात पेरमिली क्षेत्रातील सर्व शासकीय विभागात काम करणारे आदिवासी समाजाचे कर्मचारी सुद्धा सहभाग झाले होते.
सोबतच पेरमिली येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचा चौक स्थापना करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित संजय सडमेक शेंडीया, पाटील विठ्ठल मेश्राम, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, डॉ. गणेश मडावी, सोयाम, मंदा गावडे माजी सभापती अहेरी, बालाजी गावडे माजी सरपंच येरमनार, संबय्या करपेते माजी सरपंच कमलापूर, कुसुमबाई आत्राम, सुमन मेश्राम, प्रा. रतन दुर्गे, सुरज जाधव, वासुदेव कोडापे, अमरनाथ गावडे, बाबुराव तलांडी, संदीप गावडे, तिरुपती मडावी, योगेश तलांडी, रितेश गावडे, सुरज आत्राम, राजु आत्राम, सोनिया वेलादी, साजन गावडे, भिमराव सडमेक, संतोष मेश्राम, देवाजी सडमेक, डोलू मडावी, लच्या आत्राम, लक्ष्मण गावडे, दामा गावडे, महारु तलांडी, दामा आत्राम, लक्ष्मण कुळमेथे सह पेरमिली गावातील युवक, युवती पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील सर्व ५० गावातील आदिवासी समाजाचे महीला व पुरूष शेकडो संख्येने उपस्थित होते.