
पेरमिली येथे निघाली भव्य वन सप्ताह रॅली.
पेरमिली(गडचिरोली):– अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने 1 आक्टोंबर ते 7 आक्टोंबर दरम्यान प्रत्येक गावागावात वन सप्ताह रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि. 6 ऑक्टोंबर रोजी पेरमिली गावात भव्य वन सप्ताह रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली नंतर पेरमिली येथील मुख्य चौकात वनावर आधारित वनाची सुरक्षा व प्राण्याची सुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वनरक्षक पोरांललवार यांनी वनाची सुरक्षा कशी करायची, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षाचे तोड करू नये, वृक्ष आम्हाला हावडा, हिरडा, बेहडा, तेंदु संकलनातून मोठा रोजगार आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपण वनाची तोड करू नये. यावर सुंदर गीत वनरक्षक निकुरे यांनी केले तसेच पोरालवार वन कायद्याचा उल्लंघन करू नये त्यावर सुंदर गीत सादर केला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके क्षेत्राचे वनपाल वरखडे, वनरक्षक लेखामी, वनरक्षक पदा, वनरक्षक वाकडा तसेच वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.