
पेरमिली वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर.
परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके यांचे आवाहन.
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील पेरमीली वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके यांनी केले आहे.
दि 3 आक्टोंबर रोजी वनपरिक्षेत्र पेरमिली हद्दीतील येरमनार येथील नाल्यावर वाघाच्या पायाच्या पगमार्क आढळून आल्याचे वार्ता सर्वत्र पसरली होती. त्या अनुषंगाने वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या घटनास्थळावर सततच्या होत असलेल्या पावसामुळे ते पगमार्क ओळखण्यात अडचण निर्माण झाली.
दि. 5 ऑक्टोबर रोजी येरमनार व कोडसेपल्ली जंगलात वाघ आढळल्याचे वार्ता सर्वत्र पसरली. त्या वाघाला काही शेतकऱ्यांनी बघितल्याचे सुद्धा सांगितले आहे. त्या माहितीवरून पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके यांनी आपल्या वनकर्मचारा सह येरमनार हद्दीतील गुर्जा या गावात दाखल झाले. या गावात परिसरातील दहा गावकऱ्यांचा एकत्र सन सुरू होता. त्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तेथील नागरिकांना बोलावून या परिसरात वाघाच्या वावर असून सगळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करत जनजागृती केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह येरमनार, गुर्जा, चौडमपल्ली, कुरुमपल्ली येथील वन कर्मचारी उपस्थित होते.