विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसांच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड करता येणार नाहीत अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या संबंधित विभागानी दिली आहे.
ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी तसेच ई-महाभूमी या पोर्टलवरून सातबारा उतारे, आठ अ. मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाऊनलोड करता येतात. या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे. उतारे डाऊनलोड करताना अडचणी येतात. हे सॉफ्टवेअर २०१६ पासून वापरात आहे. त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते. त्यामुळेच भूमी अभिलेखने हे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विभागाकडून चालविण्यात येणारी सर्व पोर्टल १९ जुलैच्या सायंकाळी ६ वाजेपासून २२ जुलैच्या सकाळी ११ पर्यंत बंद राहतील. असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा विभागानी कळविले आहे