निमगावचा सुपुत्र चिरंजीव विठ्ठल भुजबळ यांचा ग्रामस्थांनी केला सन्मान
इंदापूर प्रतिनिधी-
निमसाखर गावचे सुपुत्र चिरंजीव विठ्ठल राजाराम भुजबळ यांची इंडियन आर्मी अग्निवीर जी डी मध्ये भरती झाल्याबद्दल जय तुळजाभवानी एकता तरुण मित्र मंडळ शिंदे पालवे वस्ती निमसाखर व समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्यावतीने मेजर विठ्ठल राजाराम भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला
अतिशय खडतर प्रवासामध्ये आई-वडिलांनी खूप कष्ट करून विठ्ठलला शिक्षण केली त्या गोष्टीची जाणीव ठेवून विठ्ठल ने सुद्धा आर्मी मध्ये भरती होऊन दाखवली त्यामुळे निमसाखर व परिसरातून त्याच्यावर कौतुकाची वर्षा होत आहे
विठ्ठल चे वडील हे शेती करतात शेतांमध्ये कष्ट घेऊन त्यांनी चार वर्ष पाटणकर अकॅडमी खुर्द विटा अकॅडमी ला विठ्ठलला ठेवले होते यावेळी सन्मान करण्यासाठी निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य शेखर संतोष पानसरे महादेव पालवे सुनील पालवे वैभव पालवे अमोल पालवे धुळदेव शिंदे राजाराम भुजबळ शिवाजी पालवे अरविंद पालवे विशाल पालवे गणेश शिंदे सुमित शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते
