
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त भामरागड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप*
भामरागड दिनांक १०
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) विभागीय अध्यक्ष आदरणीय शाहीन ताई हकीम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका महिला अध्यक्ष सौ. नंदा नाननवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या कार्यक्रमात भामरागड तालुक्यातील असंख महिला पदाधिकारी व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत, गरजू रुग्णांना मदतीचा हात देत हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
यावेळी कार्यकर्त्यांनी शाहीन ताईंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सामाजिक कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास सौ.नंदा नारनवरे यांनी व्यक्त केला.