
तेलंगणा;- तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारला तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादविरोधी सुरू असलेले ऑपरेशन कगार’ थांबवण्याची विनंती केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, या ऑपरेशन्समध्ये तरुण आणि निष्पाप आदिवासी मारले जात आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या अध्यक्षांनी माओवाद्यांशी शांतता चर्चेचे आवाहन केले. त्यांनी बीआरएस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यात एका सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आदिवासीविरोधी सुरू असलेला कृतींवर टीका केली आहे.आज, केंद्र सरकार ऑपरेशन कगारच्या नावाखाली छत्तीसगडमध्ये तरुण आणि आदिवासींची हत्या करत आहे. असे ते म्हणाले.
लोकांची हत्या करणे ही लोकशाही नाही.
शांतता चर्चेच्या कथित माओवादी प्रस्तावावर भाष्य करताना राव म्हणाले की, त्यांना संपवण्यासाठी बळाचा वापर करणे हे लोकशाहीचे तत्व नाही. “मी केंद्र सरकारला विनंती करतो की, तुम्ही लोकांची हत्या करत राहणे हे लोकशाही नाही. ऑपरेशन कगार ताबडतोब थांबवावे. नक्षलवाद्यांना चर्चेसाठी बोलवावे असे ते म्हणाले.