दिलखुश बोदलकर (वा.)
नागपूर चक ते मूरखळा चक रस्त्याची लवकर दुरुस्ती करा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हासंघठन सचिव डॉ. हेमंत भाकरे पाटील यांची तहसीलदाराना निवेदणाद्वारे मागणी.
लखमापूर बोरी :-
चामोर्शी तालुक्यातील तसेंच मूरखळा माल – भेंडाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागपूर चक ते वाकडी (जुनी) ते मूरखळा चक (बल्लू) या गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची खड्डेमय दुर्दशा झालेली असून रोज बस, मोटार सायकल व सायकल ने ये-जा करणाऱ्या गावकऱ्याना व प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास होत असून वेळ पण वाया जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हासंघठन सचिव डॉ. हेमंत भाकरे पाटील यांनी तहसीलदाराना निवेदणाद्वारे मागणी केली.
गावातील खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, पक्का रस्ता तयार होईपर्यंत तात्पुरती रस्ता दुरुस्ती करून देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्याकरिता मा. तहसीलदार प्रशांत घोरुडे, तहसील कार्यालय चामोर्शी व *कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग चामोर्शी* यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले व त्यावेळी *आमदार मा.डॉ.मिलिंदजी नरोटे* यांच्या सोबत फोनवर बोलून याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यावेळी *रा.कॉं.पा.सेवादल चे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर, रा.कॉं.पा. ओ.बी.सी. सेलचे तालुका उपाध्यक्ष मुखरू तांदुळकर, युवराज नवघडे, रवींद्र चिमूरकर, शेषराव गोहने सह अनेक नागरिक उपस्थित होते.*
