
आमदार डॉ. धर्मराव बाबांनी भाजप कार्यकर्त्यांना टारगेट करून खालच्या पातळीचे राजकारण केल्याचा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांचा आरोप.
भाजप विरुध्द गरळ ओकणार्यांना कदापी सहन केल्या जाणार नाही.- भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार
अहेरी(गडचिरोली):- महायुतीच्या बळावर निवडून आलेले आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी थेट भाजपवर आगपाखड केली हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मुळीच पटणारे नसल्याचे भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी म्हटले आहे. धर्मराव बाबांनी या पुर्वीही स्वबळाच्या वल्गना केल्या एवढेच नव्हे तर मंत्रीपदावर असतांना भाजपच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करुन खालच्या पातळीचे राजकारण केले असे संतोष मद्दीवारांनी आरोप केले. वारंवार भाजपला कमी लेखण्याचे काम त्यांनी केले. भाजपच्या जेष्ठ पदाधिकार्यांचा मंचावर पायउतारा केला हे सर्व पदाधिकार्यांनी सहन केले. भाजपचे सर्व जिल्हा तथा तालुका पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असुन स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आता भाजप स्वबळावरच लढावे अशी मागणी सुध्दा केली. अन्यथा अहेरी विधानभाक्षेत्रातील पदाधिकारी सामुहीक राजीनामा देतील असे मद्दीवारांनी सांगीतले.
राजे अम्ब्रिशराव महाराज हे भाजपच नव्हे तर स्थानिक जनतेच्या मनावर राज्य करणारे नेते आहेत. त्यांच्यावर टिका करणार्यांना येत्या काळात जनता जागा दाखवणारच असे सुध्दा सांगीतले.त्यामुळे येणार्या काळात महायुतीचे भवितव्य अहेरी विधानसभा क्षेत्रात अंधारात राहण्याचे लक्षण दिसत आहे.