
विदर्भात भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी.
नागपूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले.
या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी वडधामना (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे सुरू करण्यात आली आहे. या अंगणवाडीत मुलांना कविता, गाणी आणि अभ्यासक्रम हे VR हेडसेट्स, AI-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने शिकवले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आणखी 40 AI-सक्षम अंगणवाड्या उभारण्याचे उद्दीष्ट आहे.
ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करून प्रत्येक बालकाला जिज्ञासेने, आनंदाने आणि आत्मविश्वासाने शिकण्याची संधी मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार समीर मेघे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.