लेख
बरच काही हरवलय जे आता नाहीच सापडणार, पारावर बसणारी म्हातारी माणसं , फुगड्या खेळणारी गोंडस आज्जीबाई. काळानुरूप बदलय सगळं , बैलपोळ्याला बैलच राहिली नाहीत, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे म्हणायला गाई म्हशी सुद्धा कमी झाल्यात. कुस्ती करणारे गावातील पैलवान जिम कडे वळू लागलेत, हात पाय मुरगळा काढणारे महाशय आता शोधून सापडत नाहीत. टीव्ही चा अँटेना फिरवून चित्र सरळ करण्याची मज्जाच वेगळी होती. दूरदर्शन आता दर्शन सुद्धा देत नाही, गोधडी ची जागा आता ब्लॅंकेट ने घेतली.ढोल ताशावरची वरात आता डीजे च्या नादात नाचू लागली आहे, दिवाळीच्या कापण्या आता दिसतच नाहीत, जेवणाची पंगत आता बंद झालीये, जो तो आपलं आपलं वेळ मिळेल तस जेवत आहे, चुलीवरच जेवण आत हॉटेलला शोधावे लागेल आहे, पिठलं भाकरी गायब झालीये, भारूड -भजनकरी गावागावतुन शोधून आणावी लागत आहेत. कावळा ,चिमणी आता लांब गेलीये. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हे बालगीत आता कोणी म्हणत नाही. सारीपाटाचा खेळ,चल्लस आठ, आट्या पिट्या, लपा छपी आत कोणी खेळत नाही. घरातच मंदिर झाली आहेत देवळात जायला वेळ नाही कोणाला.लंगडी तर लंगडीच झाली आहे.
काळानुरूप बदलाचे साक्षीदार झालोय आपण फक्त. पण जीवनाची खरी मज्जा मात्र नक्कीच कमी झालीये, मामाच पत्र खरंच हरवलय जे आज शोधून सापडत नाही बर का………
##
संतोष लिम्हण-पाटील
ट्रिनिटी कॉलेज पुणे
9277997799