*म.ज्यो. फुले हाय तथा क. महा.आष्टी येथे बक्षीस वितरण सोहळा संपन्न*
आज दिनांक 20 /11/ 2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या विविध सहशालेय उपक्रमांतिल बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी भाग्यश्री जगताप पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी चे प्राचार्य डाॅ.संजय फुलझेले, तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर श्याम कोरडे, पर्यवेक्षक घाटबांधे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गीत गायले. तसेच संदीप पोरेड्डीवार यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये राखी बनवणे, हिंदी दिवस कविता वाचन व शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे शालेय स्वयंशासन अशा तिन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. यामध्ये विद्यार्थ्यांचे मिडल विभाग व हायस्कूल विभाग असे दोन गट करण्यात आले होते. यामधून एकंदरीत मिडल विभागातून व हायस्कूल विभागातून अनुक्रमे 12 विजेत्यांची निवड करण्यात आली. एकंदरीत 24 विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पीएसआयभाग्यश्री जगताप यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी कला महाविद्यालया आष्टीचे प्राचार्य डाॅ.संजय फुलझेले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका अंजली कोडमलवार, नंदा मिलमिले शिक्षक सुशील अवसरमोल, व्यंकटरामन पोलोजी,अनिल पिसे, श्रीनिवासन वेनमपल्ली, राजेशमअंबीलप्पू, विनोद भूरसे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून कनिष्ठ लिपिक राजेश्र्वर बर्लावार,शिपाई लक्ष्मण दुरशेट्टी, बंडू दडजाम, योगेश दिवटेवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्तेश रत्नावार यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदा मिलमिले यांनी केले.
