संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
एटापल्ली | प्रतिनिधी
संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे आज दिनांक ०३ जानेवारी रोजी थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन शाळेची शाळा प्रमुख आराध्या तुषार पवार हिने केले. यावेळी शाळेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग व स्वयंसेवा करणाऱ्या स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष विजय संस्कार तसेच मुख्याध्यापिका पूजा संस्कार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी व समाजाने आपले जीवन सार्थक करावे, असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला.
सदर कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
