
पेरमिली(गडचिरोली):- ९ ऑगस्ट हा दिवस विश्व जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत. या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. संयुक्त राष्ट्र महासभेने १९९४ हे पहिल्यांदा आदिवासींचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून कोरेली(खुर्द) येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात उदघाटक म्हणून मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी,अध्यक्ष स्थानी डॉ. गणेश मडावी, प्रमुख अतिथी म्हणून पेरमिलीचे नवभारत पत्रकार असिफ खान पठाण, सरजू आत्राम पेसा अध्यक्ष, माजी पेसा अध्यक्ष लालसू पुंगाटी, कोरके तलांडी, सुधाकर आत्राम, वाणी आत्राम, मानो आत्राम, मादी तलांडी, बुरसी आत्राम तसेच सुनीता मडकामी हे होते. यावेळी मान्यवराने आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता गावातील लोकांनी परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालसू पुंगाठी तर आभार सुधाकर आत्राम यांनी मानले.