
कोरची येथे तालुका स्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले यांची भेट.
कोरची:- जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,गटसाधनकेंद्र,स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण क्षमतावृध्दी प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन गट साधन केंद्र कोरची येथे करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी केले यावेळी अध्यक्ष म्हणून कोरचीचे केंद्रप्रमुख हिराजी रामटेके प्रमुख अतिथी म्हणून देवडी केंद्राचे केंद्रप्रमुख नेवारे, तज्ञ मार्गदर्शक विनायक लिंगायत, प्रमोद वाढणकर ,गुरुराज मेंढे आदी उपस्थित होते.
*शिक्षकांच्या क्षमता वाढवून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी या पाच दिवसीय प्रशिक्षणात एकुण सोळा विषयावर अंतर्गत चर्चा करुन शिक्षकांच्या क्षमता वाढवायच्या आहेत.शिक्षकांच्या ज्ञानात भर पडली व तो ज्ञान समृद्ध झाला तरच तो विद्यार्थीचे ज्ञान वाढवून शकते.म्हणूनच हे प्रशिक्षण शिक्षक,मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेला फार उपयुक्त आहे.म्हणून या प्रशिक्षणाला सर्वांनी पुर्ण वेळ उपस्थितीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी केले.
प्रशिक्षण का व कशासाठी ? नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांनी अपडेट असावे.शिक्षक क्षमता समृद्ध असेल तरच तो शाळा स्तरावर विद्यार्थीसाठी काम करु शकेल असे मार्गदर्शन केंद्रप्रमुख हिराजी रामटेके व विनायक लिंगायत यांनी केले.
या प्रशिक्षणाला सुलभक म्हणून विनोद भजने, प्रमोद वाढनकर, सुरज हेमके, गौरव कावळे, नरेश रामटेके, गुरुराज मेंढे, महेश खूने,नीलकमल बिझलेकर ,संतराम धीकोडी, विलास खानोरकर, जया मडावी, वर्षा चुधरी, प्रशांत भगत, अनिता चावर, लक्ष्मी गटपल्लीवार, आसाराम फूलकवर, शिवराज सोमनकर हे सुलभक म्हणून काम करणार आहेत.
प्रास्ताविक प्रशिक्षण प्रमुख विषय साहाय्यक प्रमोद वाढनकर यांनी केले.संचालन सुलभक सुरज हेमके यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार विषय शिक्षक नरेश रामटेके यांनी केले.
या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ प्राथमिक व माध्यमिक मधील 100 शिक्षक घेत आहेत.
प्रशिक्षण यशस्वितेसाठी साधन व्यक्ती योगेश शुक्ला, मीना शहारे, विनायक लिंगायत व गटसाधनकेंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.