
बुलढाना:-जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने 35 शिक्षकांना निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासाळल्याने अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे.
बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा चिंतेचा विषय बनलाय. याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारलाय. 20 शाळांतील 35 शिक्षक निलंबित केले असून, 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. यामुळे मात्र शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडालीय.