आज दिनांक 10/02/2026 रोजी मंगळवारच्या दिवशी पारंपरिक इलाका सुरजगड पट्टी येथे ग्रामसभेमार्फत आदिवासींचे महामानव गुंडाधुर दुर्वे यांच्या 1910 च्या भूमकल आंदोलन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष कल्पना आलाम, सम्मा जेट्टी (सल्लागार, सुरजगड इलाका), आशिष हिचामी (सहकोषाध्यक्ष), मधुकर नरोटे (कोषाध्यक्ष), बंडू दोरपेटी (उपाध्यक्ष, सुरजगड इलाका) आदी मान्यवर उपस्थित होते.
सन 1910 मध्ये बस्तर क्षेत्रात आदिवासी समाजाच्या हक्क, अधिकार तसेच जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी इंग्रजांच्या विरोधात गुंडाधुर दुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भूमकल विद्रोह आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्या महान क्रांतीची आठवण व आदर व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सुरजगड पट्टीतील सर्व इलाका पदाधिकारी, सदस्य तसेच समस्त पेरमा, भूमिया, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.
