अहेरी (गडचिरोली):- राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा च अहेरी विधानसभा क्षेत्रात वडील मुलगी आणि पुतण्या अशी अहेरीच्या राजघराण्यात लढत रंगली होती. त्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अपक्ष उमेदवार माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांना 16857 पेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा विजय साजरा केला.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मैदानात असलेल्या भाग्यश्री आत्राम ह्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
पहिल्या फेरीपासूणच धर्मरावबाबानी आपले मताधिक्य कायम ठेवले होते.शेवटच्या फेरीपर्यंत आपली विजयी आघाडी कायम ठेवून विजय संपादन केला.
हा आपल्या विकासकामांचा व जनतेनी दिलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे,.
विजयानंतर अहेरी विधानसभेतील प्रत्येक गावात रॅली व फटाके फोडून महायुती च्या कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला.