*अवैध रेती उत्खननास अभय कुणाचा?*
हिंगणघाट:- जिल्हा प्रशासनाचे कडक निर्देश असताना सुद्धा रेती घाटावर रेती तस्कराने हौदास घातला असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे दिसून येत आहे.
आजनसरा येथील काही रेती माफियानी रात्रंदिवस दररोज 3 ते 4 ट्रॅक्टर चा सहाय्यनी 20 ते 25 ब्रास रेती उत्खनन केले जात आहे. या रेती माफियाने अवैध रीतीने उत्खनन केलेले रेती नदी जवळ असलेल्या जागेवर 100 ते 150 ब्रास रेती साठवणूक करून ठेवल्याचे बोलले जात आहे. या उत्खननास महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वाद असल्यानेच सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी आजनसरा येथील रेती घाटावर SDPO हिगणघाट यांच्या डीबी पथकाने अवैध रेती उत्खनन करणाऱ्यावर करवाई केली होती. त्यावेळी रेती माफीयांचे धागे दनाणले होते. त्यानंतर काही दिवसांनी रेती माफिया कडून रेती उत्खनन केली जात आहे. या रेती माफीया यांना कुणाचीच भीती नसल्याचे दिसून येत आहे. या रेती माफीया वर महसूल प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.