
पेरमिली:- दि.09 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दल व पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, यतीन देशमुख (अप्पर पोलीस अधीक्षक अभियान) कुमार चिंता ( अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन),एम.रमेश( अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी) यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन पेरमीली येथे उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व उप पो स्टे पेरमिली संयुक्त विद्यमाने भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सदर मेळाव्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे सोबत पेरमिली हद्दीतील गाव पाटील तसेच पोस्टेचे प्रभारी अधिकारी दिपक सोनुने यांच्या उपस्थितीत सर्व प्रथम विर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभारी अधिकारी दिपक सोनुने यांनी गडचिरोली पोलिस दलामार्फत मिळणाऱ्या शासकीय योजना व ईतर दाखले, मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना या बाबत मार्गदर्शन केले.गडचिरोली येथील आधार कार्ड ऑपरेटर यांना बोलावून आधार अपडेट,जुने आधार कार्ड दुरुस्ती, नविन आधार कार्ड काढून घेणे बाबत नागरिकांना सांगितले.या मेळाव्यात
1) साडी वाटप- 40
2) टाॅर्च वाटप – 30
3) छत्री – 30
4) घमेले- 15
5) युरिया बॅग- 20
6) लुगळे वाटप- 15
7) फावळा- 15
8) पिवळे दुप्पटे- 20
9) धोतर- 20
10) प्लास्टिक घोंगडी – 50
शासकीय दाखले काढने:-
1) नविन आधार कार्ड -30
2) आधार प्रिंट -20
3) आभा कार्ड -20
4) सातबारा -30
5) आयुष्यमान कार्ड -12
6) ईन्कम सर्टिफीकेट-08
पेरमिली हद्दीतील कोरेली(बु), आलदंडी ,येरमनार, पल्ले, चंद्रा,कचलेर,कोलसेलगुडम(पेरमिली),या गावातील आलेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तू व शेतीपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
सदर मेळाव्यास पेरमिली हद्दीतील 450 ते 500 नागरीक उपस्थित होते.उपस्थीत नागरिकांची चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली व मेळाव्याचे सांगता करण्यात आले