बेसेवडा येथे भव्य बांबू उद्घाटन सोहळा संपन्न
मौजा बेसेवडा, ग्रामपंचायत गट्टा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे ग्रामसभेमार्फत दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य बांबू उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संजय नरोटी, पोलीस पाटील, बेसेवडा यांच्या हस्ते करण्यात आले. सह-उद्घाटक म्हणून गाव भूमिया श्री. मंगेश नरोटी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सम्मा जेट्टी, अध्यक्ष, सुरजगड इलाका सल्लागार हे होते.
कार्यक्रमास श्री. देवू हिचामी (सचिव, इलाका सचिव), श्री. बंडु दोरपेटी (उपाध्यक्ष, सुरजगड इलाका), श्री. पत्तू पोटावी (जिल्हा सदस्य, ग्रामसभा), श्री. लक्ष्मण जेट्टी (ग्रामसभा सदस्य), श्री. आशीस हिचामी (सहा कोस अध्यक्ष) यांच्यासह निकेश नरोटी, मुरा नरोटी, धर्मा नरोटी, गणेश कोरसा, समस्त गावकरी तसेच पेपर मिलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सुरजगड इलाक्यातील ग्रामवासीयांना बांबूच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असून, स्थानिक नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
