
राजाराम गावातील पथदिव्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.
गावातील सर्व वार्डात अंधाराचे साम्राज्य.
अहेरी:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायतीच्या सर्व वार्डातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप,विंचू व इतर सरपटणारे प्राण्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच अंधाराचा फायदा घेऊन काही इसम चोरी व इतर अनुचित प्रकार करु शकतात. असे प्रकार होऊ नये, यासाठी राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने पथदिवे दुरुस्ती करून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गावातील नागरिकांनी या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायतला निदर्शनास आणून दिले परंतु अद्यापही पथदिवे दुरुस्त करण्यात आले नाही. काही अनुचित घटना घडल्यानंतरच ग्रामपंचायतची झोप उडणार की काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते , आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व इतर महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केलं जातं आहे.राजाराम ग्रामपंचायतीने सन 2024 मध्ये प्रत्येक वार्डामध्ये पथदिवे बसवण्यात आले होते, सध्या सर्व वार्डातील जवळपास 90 टक्के पथदिवे बंद अवस्थेत पडले आहेत.ग्रामपंचायत हे वर्षातून एकदाच पथदिवे लावले जातात का,लावलेले पथदिव्यांची देखभाल कोण करणार असं अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.राजाराम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वार्डातील पथदिवे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.