पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येच्या उर्वरित आरोपींना पकडून शिक्षा द्या
गडचिरोलीत मुक मोर्चाचे आयोजन, जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली -छत्तीसगड येथील NDTV चे पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निर्घण हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येचा निषेधार्थ उर्वरीत मारेकऱ्यांना पोलीसांनी पकडून कठोर शिक्षा घ्यावी या मागणीसाठी गडचिरोली येथे पत्रकारांचा मुक मोर्चा गुरुवार दि. ०९ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता मोर्थ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर मोर्चात दैनिकांचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, ग्रामीण प्रतिनिधी, साप्ताहिक विंग व लोकल दैनिकाचे जिल्हयातील संपादक, पोर्टल, युट्युब गामाचे प्रतिनिधी vom चे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींनी मोर्चात सहभागी होवून एकतेचे दर्शन घडवावे हि विनंती.
– सुचना –
मोर्चा इंदिरा गांधी चौकातून जिल्हा कचेरीवर नेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल तरी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे गुरुवार दि ०९ जानेवारीला दुपारी १२ वाजतापर्यंत एकत्रित जमावे व मुक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवेदनाद्वारे केलेले आहे