
अहेरी पोलिसांनी सहा आरोपींवर केले गुन्हा दाखल.
अहेरी(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात दोन वेगवेगवेगळ्या घटनांत गायींची कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या आरोपाखाली अहेरी पोलिसांनी ६ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
अहेरी तालुक्यातील आपापल्ली व खमनचेरू येथे दि.२९ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गायींची कत्तल करून गोमांस विक्री केले जाणार असल्याची माहिती अहेरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार आपापल्ली येथील एका शेतात गायीची कत्तल करताना चिंतलपेठ येथील विजय कोलेकर व त्याचे दोन साथीदार आढळून आले. या घटनेत पोलिसांनी विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली आहे.
दुसऱ्या घटनेत खमनचेरू येथील शेतात गायीची कत्तल करून गोमांस विक्रीकरिता काढताना ४ आरोपी पोलिसांना आढळून आले. यामध्ये फुलाबाई नानया गोलेटीवार, अमित नानाया गोलेट्टीवार, नितीन नारायण निष्ठरवार, सर्व रा. खमनचेरू, कैलास आशया लिंगमपल्ली, रा. पापणपेठ (तेलंगाना) यांना पोलिसांनी अटक केली असून दोन्ही घटनांतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास अहेरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार करीत आहेत.