*गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी*
गडचिरोली दि. २८ : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकींमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
हा निर्णय मागील वर्षी कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापती आणि यवतमाळ येथे धार्मिक तेढ निर्माण झालेल्या घटनांमुळे घेण्यात आला आहे.
५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही बंदी लागू राहील आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
