
दारव्हा तालुक्याच्या वतीने मंत्री संजयभाऊ राठोड यांचा जाहीर सत्कार.
जया लाभसेटवार
दारव्हा/यवतमाळ.
दारव्हा:- दारव्हा तालुक्याच्या वतीने संजयभाऊ राठोड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश तसेच दिग्रस, दारव्हा, नेर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मायबाप जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मला नेहमीच ऊर्जा आणि पाठबळ मिळते असे ते म्हणाले.मी देखील मुलगा, भाऊ या नात्याने मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख- दुःखात सहभागी होत सर्वांगीण विकासाला चालना देत आहे. शेतकरी, महिला, युवा तसेच सर्वच घटकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी शासन तसेच सामाजिक जाणिवेतून सुरू असलेल्या उपक्रमातून काम करत असल्याचे ते म्हणाले.
आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सोबतीने आपला मतदारसंघ विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.