
एटापल्ली शहरात पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
जनार्धन नल्लावार
एटापल्ली प्रतिनिधी
एटापल्ली : शहरात पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त निर्मला कोंडबत्तूलवार नगर पंचायत बांधकाम सभापती,एटापल्ली यांच्या शुभहस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निर्मला कोंडबत्तूलवार नगर पंचायत बांधकाम सभापती, बाबुराव गंपावर भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष, विजय नल्लावार माजी भाजपा जिल्हा सचिव, मोहन नामेवार जिल्हा सचिव, संपत पैडाकुलवार तालुका महामंत्री, राकेश हिरा तालुका महामंत्री, बाबला मजुमदार तालुका महामंत्री,राकेश तेलकुंटलवार शहर अध्यक्ष, सुरेखा अडगोपूलवार तालुका महिला शहराधक्ष,समा जेट्टी आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष, हरीश कुमरे तालुका उपाध्यक्ष, देब्रत गाईन तालुका उपाध्यक्ष, आदी उपस्थित होते.