
एटापल्ली पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न*
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतला आढावा*
जनार्धन ओ. नल्लावार इंद्रावती विदर्भ एप्रेस एटापल्ली ता. प्रतिनिधी
अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली पंचायत समितीची वार्षिक आमसभा मंगळवार 30 सप्टेंबर रोजी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वार्षिक आमसभेत उप विभागय अधिकारी राऊत साहेब, तहसीलदार हेमंत गांगुळे, sdpo चैतन्य कदम गटविकास अधिकारी आदिताथ आदळे, तालुका अध्यक्ष संभा हिचामी प .स. उप . सभापती जनार्धन ओ . नलावार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सैनु गोट व संजय चरडूके, पस. माजी सभापती बेबी लेकामी, ब, राकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामजी कत्तीवार तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विविध विभागांचा आढावा घेत सर्वसामान्य नागरिकांची समस्या जाणून घेतली. या वार्षिक आमसभेत मागील वर्षी नियोजन केलेले तसेच प्रलंबित कामे पूर्ण झाल्याचे खात्री करत सुरू असलेल्या कामांचा तसेच शासनातर्फे विविध विभागात राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.
या वार्षिक आमसभेला एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.