पेरमिली येथे ‘श्री राम रक्षा हनुमान मंदिर सेवा समिती’ची स्थापना.
धार्मिक व सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी चालना.
अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे धार्मिक व सामाजिक एकतेला बळ देण्यासाठी ‘श्री राम रक्षा हनुमान मंदिर सेवा समिती’ची उत्साहात स्थापना करण्यात आली. गावातील नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समितीची स्थापना करत नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या समितीच्या स्थापनेमुळे परिसरात धार्मिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बंडमवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुरज सेनगारपवार, सचिवपदी रघुनाथ औतकर, तर सहसचिवपदी सचिन सिदमशेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी तुळशीराम चंदनखेडे तर सहकोषाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मण विश्वास यांची निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी सत्यनारायण येगोलापवार, रामरेड्डी बंडमवार, डॉ. उत्पलकुमार विश्वास, पंकज येगोलापवार, सत्यनारायण चंदनखेडे, कन्हाई मंडल, राजीव बोमनवार, प्रफुल ढोंगे, रजनीकांत येगोलापवार, मोरेश्वर चंदनखेडे, पिंटू विश्वास, रामचंद्र गट्टूवार, सनथ चंदनखेडे, रितिक मडावी, ताराचंद मिस्त्री, कवीश्वर चंदनखेडे, सचिन सडमेक, मुकेश सडमेक, विनायक येगोलापवार, गजानन मडावी, मनीष बाचाळ, आकाश सेनगारपवार, विनोद नारायण मडावी, आर्यन मुडावार, देवानंद चंदनखेडे, अमित औतकर, आकाश औतकर, संदीप मडावी, तिरुपती कत्तीवर, विनोद औतकर, तिरुपती कोसरे व रुपेश हजारे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला सदस्य म्हणून पूजा चंदनखेडे, जयाताई औतकर, सत्यताई येणपरेड्डीवार, प्रियंका ढोंगे, पौर्णिमा सिदमशेट्टीवार, सपना बंडमवार, रजिता मुळावर, रूपाली चंदनखेडे, शकुंतला पडालवार व सविताताई चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. भविष्यात समितीच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व जनकल्याणकारी कार्य राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
