*कोरची येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*
*कार्यक्रमांमध्ये महिलांचा दिसून आला उत्स्फूर्त सहभाग*
*कोरची* : शहरातील महात्मा फुले चौक येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून थोर पुरुषांना माल्यार्पण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोरची नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. हर्षलताताई भैसारे हे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. कांता मॅडम शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, नंदू वैरागडे, शालिकराम कराडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हिरामण मोहुर्ले, केशव मोहुर्ले, विजय कावळे, मनीराम मोहुर्ले, हरिचंद्र गुरनुले, देवाजी मोहुर्ले, ऋषी मोहुर्ले, जीवन शेंडे, पांडुरंग कावळे, यादव खोब्रागडे, मुरलीधर रुखमोडे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये सुनीता मोहुर्ले व त्यांच्या संचानी स्वागत गीत म्हणत उपस्थितितांचे स्वागत केले. यावेळी वंशिका मोहुर्ले हिने सुद्धा लावणीवर नृत्य सादर केले.
सदर कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी घेतलेली अपार मेहनत, परिश्रम, संघर्ष व त्यांच्यावर करण्यात आलेले अत्याचार यावर प्रकाश टाकत आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांना शिक्षणाची पायाभरणी करता आली व आज देशाच्या सर्वोच्च पदावर स्त्रीशक्ती विराजमान असल्याचे मार्गदर्शकांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधीत केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गौरव कावळे यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले. संध्याकाळी संपूर्ण शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक गौरव कावळे यांनी केले तर आभार मानसी वाढई यांनी मानले.
